अंधश्रद्धा वर मराठी निबंध | Andhshradha Essay in Marathi
मित्रांनो आज आपण “जेथे अंधश्रद्धाच्या हाका, तेथे ढुंकूनही पाहू नका” या विषयावर निबंध बघणार आहोत.मी आशा करते की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल आणि उपयुक्त ठरेल. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.
अंधश्रद्धा वर मराठी निबंध | Andhshradha Essay in Marathi
जेथे अंधश्रद्धाच्या हाका , तेथे ढुंकूनही पाहू नका मराठी निबंध
आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. परंतु अजूनही आपल्या समाजावर अंधश्रद्धेचा पगडा दिसून येतो. अंधश्रद्धा हा मानवी समाजाला मिळालेला शाप आहे. अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसलेला असतो.श्रध्दा ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेवा आहे. साधू, महंत, बुवा, महाराजांच्या कडून फसवल्या गेल्याच्या तरुण-तरुणींच्या शोकातिकेच्या दुःखद वार्ता सतत आपल्या कानावर येत असतात. तेव्हा लक्षात येते की अजूनही आपला समाज अंधश्रद्धेच्या निविदा अंधारातच चाचपडत बसला आहे.
ह्या वैज्ञानिक जीवनात किंवा वैज्ञानिक युगात लोक कस काय अशा चमत्कारांवर किंवा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवतात हेच कळत नाही. ग्रहण ,तारे ,ग्रह या सर्वांविषयी शास्त्रज्ञ माहिती आज विज्ञान आणि आपणाला उपलब्ध करून दिली आहे ग्रहांतील विशिष्ट स्थित्यंतरे आपण दूरदर्शनवरही पाहतो तरी आजही ग्रहणांविषयीचे अनेक कल्पना आपण अंधश्रद्धेने जोपासत असतो. तसेच निवडणुकीचा अर्ज भरणे नवीन चित्रपटाची सुरुवात करणे किंवा एखादी नवीन वस्तू विकत घेणे याला देखील शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते.
तुम्हाला याच अंधश्रद्धेबद्दल एक उदाहरण सांगते, एका खेड्यात नुकतीच घडलेली ही घटना आहे झाडे लावल्यावर आठ वर्षे उलटली तरी केळीच्या झाडाला केळी आली नाही म्हणूनच त्या शेतकऱ्याने एक यज्ञ करून दोन बकऱ्यांचा बळी दिला अशीच गाजलेली दुसरी एक घटना गुप्तधन मिळावे म्हणून मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वतःच्या पोटच्या लहान मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न चालू असताना पोलिसांनी त्यांना पकडले. अशा या घटनांनी काळीज पिळवटून टाकलं गेलं. आपण आता एकविसाव्या शतका त पदार्पण केले आहे तरी देखील आपल्या समाजात असे भयानक प्रकार घडत आहे.
आपण अजून देखील खूप सारा अंधश्रद्धा पाहतो मांजर आडवे गेल्याने काम होत नाही असं म्हणलं जातं एक अंधश्रद्धाच आहे आपण आपली विचार पद्धतीच बदलली पाहिजे प्रत्येक घटनेमागील कारण आपण शोधले पाहिजे स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे असे नाही आपल्याला पुढे प्रगती करायची असेल तर विज्ञानाच्या सहाय्याने पुढे जावं लागेल तरच आपलं यश नक्की आपल्याला भेटेल. नाहीतर आपण या जगापासून खूप मागे राहू आणि जग पुढे निघून जाईल.
अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील अंधश्रद्धा हा आपल्या समाजाला मिळालेल्या सर्वात मोठा शाप आहे या शाप पासून मुक्त होण्यासाठी अंधश्रद्धा नाहीसे करावे लागेल आणि यात जरी असे व्हायचं असेल तर अंधश्रद्धा म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल अंधश्रद्धा म्हणजे काय हे स्पष्टपणे कळले तरच ती नष्ट करणे शक्य होईल म्हणून अंधश्रद्धा म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ या जगात घडणाऱ्या घटना या विशिष्ट निसर्ग नियमाने होतात निसर्ग नियमान विरुद्ध कोणीही काही करू शकत नाही. या जगात जितक्या साऱ्या गोष्टी होत्या त्या विज्ञानाच्या सहाय्याने होतात त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे पण त्या शास्त्रीय कारण आज आपण अंधश्रद्धा बनवून टाकला आहे.
जर या अंधश्रद्धेच्या व्याधीला नष्ट करायचं असेल तर सामाजिक प्रबोधनाची नितांत गरज आहे आपण सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संस्थांचे कार्य नीट समजून घेतले पाहिजे तरच अंधश्रद्धेचा हा कलंक कायमचा पुसून टकने शक्य होईल.
Andhshradha Essay in Marathi | अंधश्रद्धा वर मराठी निबंध
मित्रांनो तुम्हाला जर आज झाले का आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आजच्या लेखामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या देखील कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट वाचून पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते.
धन्यवाद
अंधश्रद्धा वर मराठी निबंध | Andhshradha Essay in Marathi
- andhshradha essay in marathi
- andhashraddha essay in marathi
- andhashraddha in marathi essay
- andhashraddha marathi nibandh
- andhashraddha nirmulan marathi nibandh