खालील मुद्द्यांवर आधारित कथालेखन करा.
लक्ष्मण नावाचा तरुण____ कैदेत____ गाव प्रमुखाचे कैद खाण्याचे निरीक्षण करणे____ लक्ष्मणाची सुटकेसाठी विनंती__ सुटका व आर्थिक मदत ____लक्ष्मण पक्षी घेऊन बाजारात ____सर्व पक्षी पिंजरा सहित विकत घेणे ____पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह_______ पक्षांची पिंजऱ्यातून मुक्तता_____ मुक्ततेचा आनंद____ बोध
उत्तर:
स्वातंत्र्याचे मोल
रामपूर नावाचे गाव होते त्या गावातील राजाचे शासन अतिशय कठोर होते कोणीही छोटा मोठा गुन्हा केला तर त्याची पाठवणे थेट कैदखान्यात होत असे लक्ष्मण नावाचा एक तरुण मात्र निर्दोष असूनही कैदेत सापडला होता कैदेत असताना त्याला रोजचे जेवण वेळेवर मिळत होते. मात्र बाहेरचे जग आणि नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला होता एके दिवशी तेथील गाव प्रमुखांनी केळ खाण्याला भेट दिली आणि कैद खाण्याचे निरीक्षण केले लक्ष्मण्यति संधी समजून त्या गावप्रमुखाकडे सुटकेसाठी विनंती केली लक्ष्मणचे आजवरचे वर्तन व प्रामाणिकपणा पाहून गाव प्रमुखाला त्याची दया आली त्यांनी आपल्या सैनिकांना लक्ष्मण ची सुटका करण्याचे आदेश दिले व त्याला काही आर्थिक मदतही देऊ केली.
कैद खाण्यातून सुटका झालेला लक्ष्मण थेट पक्षी बाजारात आला गावच्या पक्षी बाजारात पिंजऱ्यात अनेक पक्षी विक्रीसाठी ठेवले होते त्याने आपल्याला मिळालेल्या पैशातून हे पक्षी पिंजरा सहित विकत घेतले पक्षी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले लक्ष्मण ने एका मागोमाग एक साऱ्या पक्षांना पिंजऱ्यातून मुक्त केले पिंजऱ्यातून मुक्त होताच पक्षांनी आनंदाने आकाशात भरारी घेतली त्या भरारी घेणाऱ्या पक्षांकडे लक्ष्मण आनंदाने पाहत राहिला पक्षी विक्रेत्याने त्याला विचारले अरे लक्ष्मण हे तू काय केलेस त्यावर त्यांनी हसत उत्तर दिले माणूस असो की प्राणी किंवा पक्षी कैदेत राहणे कोणालाच आवडत नाही प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचे मोल प्राण्यांपेक्षाही श्रेष्ठ वाटते मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि म्हणून या साऱ्या पक्षांना मी मुक्त केले.
हे सांगताना लक्ष्मणच्या चेहऱ्यावरील स्वतःच्या आणि पक्षांच्या सुटकेचा आनंद तर दिसत होताच पण त्याचबरोबर आपण केलेल्या एका चांगल्या कामाचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.
तात्पर्य :स्वातंत्र्य मोलाचे असते.
मित्रांनो अशा प्रकारचे कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. विशेषतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे कथालेखन विचारले जाऊ शकतात कथा आधीच दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असते त्यामुळे मी अशी आशा करते की मी हा पोस्ट बनवते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या प्रचंड पोस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद.
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी