गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Shetakaryanche manogat marathi nibandh

गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Shetakaryanche manogat marathi nibandh


गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध | Shetakaryanche manogat marathi nibandh

  गरीब शेतकऱ्याचे मनोगत: नमस्कार मित्रांनो शेतकरी केवळ आपल्या भारताचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे शेतकरी शेतात रात्रंदिवस कष्ट करतो आणि शेतातून अन्नधान्य पिकवतात तेव्हा कुठे आपल्याला पोटभर जेवण मिळते आपण सर्व जेवण करून मस्त असतो परंतु जगाचा पोट भरणारा शेतकरी कधीतरी उपाशी असतो .हे दुर्दैव.

  शेतकऱ्याचे अडीअडचणी समस्या जाणून घ्यायला कुणाला वेळ आहे प्रत्येक जण आपापल्या परीने विकास करण्याच्या आणि पैसे कमावण्याच्या नादात धुंद आहे पण आपला रक्षण करता आपला पोशिंदा कोण आहे तो कसा आहे याचा आपल्याला काहीच घेणं देणं नाही. आपण देशाचा कितीही विकास केलात कितीही पैसे कमवले तरीही जोपर्यंत शेतकरी आणि शेती समृद्ध होणार नाही तोपर्यंत तुमच्या कार्याला काहीच अर्थ राहणार नाही हे कोण सांगणार लोकांना. जर शेती आणि शेतकरी समृद्ध नसेल तर काय पैसे खाणार आहात का?


गरीब शेतकऱ्याचे मनोगत ( shetkaryache manogat marathi nibandh)

आज आपण कधी जर शेतकरी बद्दल बोललो तर सर्वांनाच आठवते ती म्हणजे आत्महत्या. जणू आज काल शेतकरी म्हणजे ही आत्महत्याच झालीय. असं सर्वांना वाटतं शेतकरी म्हणलं की सर्वांनाच आठवतो जो व्याजाला कंटाळून आत्महत्या करतो. कधी कुणी त्या आत्महत्येचं कारण कधी विचारलंय का? त्यांनी आत्महत्या का केली त्याला किती दुःख होतं त्यांनी किती हाल सोचले रात्र दिवस केलेले कष्ट कोणीच लक्षात घेत नाही. हे खूपच दुःखद आहे!

मी मागच्या वर्षी सुट्ट्यांमध्ये गावाकडे गेले होते.गावाकडे गेले की आंबे ,पेरू ,आवळे ,बोर , पापयी,जांभूळ असा रानमेवा खाणे आणि शेतातील गोळ्या सोबत वेळ घालवणे. त्यांना चारा घालने पाणी घालने हा माझा आवडीचा उपक्रम.

एक दिवशी संध्याकाळचे वेळ गावच्या राम मंदिराकडे निघाले होते देवाचे दर्शन घेतलं ते थोड्या वेळ तिथेच मंदिरात बसावे या हेतूने मी जागा शोधत होते तेवढ्यात मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली एक काका भेटले ते थोडे टेन्शनमध्ये दिसत होते त्यामुळे मी त्यांना टेन्शनच कारण विचारलं. त्यांनी थोड्या हळू आवाजात उत्तर दिले, तुम्हाला शाळेत जाणाऱ्या मुलांना काय करणार आमच्या शेतकऱ्यांची व्यथा? आणि त्यांनी त्यांचं मनोगत आत्मकथन सांगायला सुरुवात केली.

See also  मी वृक्ष बोलतोय निबंध मराठी | Mi Zad Boltoy Marathi Nibandh

बाळा, माझं नाव चंद्रकांत लक्ष्मीकांत पाटील. गावच्या कडाला माझी आठ एकर शेती आहे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि माझे दोन्ही मुलं तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आहेत. शेतात दरवर्षी नवीन नवीन पीक मी घेत असतो त्यावर घराचा सर्व खर्च चालतो लेकरांचे शिक्षण होतात घरचा किराणा लेकरांचे शिक्षण शेतीत देखील खूप पैसा लागतो त्यानंतर पेरणी नांगरणी सर्वच खर्च असतात पण यंदा सोयाबीनची पेरणी झाल्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. आज दोन महिने झाले तरी पण पाऊस पडायचा काही नियम दिसत नाही. पाऊस आम्हा शेतकऱ्यांची कुठली परीक्षा पाहतोय कुणास ठाऊक!

शेतातील पीक वाळून चालले सोयाबीन तर शेंगा धरायच्या आधीच कोमेजून गेली आहे कापसाची पण तसेच तशा आहे असे चालत राहिलं आणि आणखी काही दिवस पाऊस नाही पडला तर पिकांचे काय होईल यांना उत्पन्न तरी कसं होईल आणि घर खर्च कसा भागवायचा आणि पोरांच्या शिक्षणाला पैसे तरी कुठून पाठवायचे.

त्यामुळे अगदी वैताग आलाय नाही नाही ते विचार मनात यायला लागले मागच्या पेरणीसाठी पाहुण्यांकडून खत बियाण्यासाठी पैसे घेतले होते ते देखील पैसे परत द्यायचे. आता इथून पुढचा प्रपंच कसा भागवावा या विचाराने डोकं दुखतंय काही सूचना सरकार पण काही मदत करत नाही डोक्यात नुसते वाईट वाईट विचार येत आहेत. पाहुण्यांचे पैसे कसे फेडायचे पुढच्या पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे लेकरांच्या शिक्षणासाठी तर पैसे लागणारच घरचा किराणा प्रपंच सगळा भागवायचा आहे आणि प्रश्न डोक्यात घर करून बसले आहेत.

पुढच्या लेकरासारखे आम्ही शेतीची आणि पिकाची काळजी घेत असतो परंतु पावसाने जर खेळ केला तर संपूर्ण पिकाचे नुकसान होतं त्यात पिकाला फवारे मारावे लागतात कारण की किडे होतात त्याला तर वेगळेच पैसे लागतात आम्ही दिवस राहतो शेतात मेहनत घेतो राबराब राहून असे वाईट दिवस शेतकऱ्याला पहावे लागतात पुढच्या लेकरासारखं जगतो त्या शेतीला. शेवटी निसर्गापुढे कुणाचे काही चालते का?

See also  माझी आई मराठी निबंध | Mazi Aai marathi nibandh

तुम्ही मोठ्या उत्सुकतेने विचारता की शेतकरी गळफास का घेतो? आत्महत्या का करतो ?पण मग अशा वेळेस शेतकऱ्यासमोर फास घेऊन जीव संपवण्याशिवाय कुठला पर्याय उरतो. तुम्ही शहरी लोकांना काय करणार आमच्या शेतकऱ्याची व्यथा…?

जितकं पिकाचा पैसा भेटतो जितका उत्पन्न भेटतो त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना जातो आणि उरल्यास उरल्या मालाला सरकार कवडीमोल भावात घेतो इतक्या पैशात कस काय मागणार सगळे खर्च. पाऊस निसर्ग देखील कधीतरी साथ देतो परंतु जे पीक निघतो त्यातला निम्मा हिस्सा तर असाच जातो. सरकारकडून पिकाला चांगला भाव मिळत नाही शेतकऱ्याला तर कुणीच देऊ नाही असे बोलून ते काका त्यांचं बोलणं संपवतात आणि तिथून निघून जातात.

मी तिथे मात्र त्याच गोष्टीचा विचार करत बसली होती त्या गरीब शेतकऱ्याचे मनोगत ऐकून माझे देखील डोळे पाणवले आणि मी निखिल मला ठाम केलं की संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मी माझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करणार आहे खूप शिकून एखादे मोठी अधिकारी होईल आणि त्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी नक्कीच मिळेल आणि त्यांना हक्काचा हमीभाव आणि इतर सुविधा मिळवून देईल खरच शेतकरी राजा खूपच महान आहे त्याला माझे शतशः नमन !


आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत सांगणार आहे आणि ही पोस्ट तुम्हाला नक्कीच फायदा देईल अशी आशा करते.

मित्रांनो या पोस्टमध्ये आपण गरीब शेतकऱ्याचे मनोगत पाहिले मला आशा आहे की तुम्हाला हा निबंध नक्कीच आवडला असेल तुम्ही हा निबंध पहिलीपासून ते बारावीपर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता. तुम्हाला जर या निबंधात काही चुका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्हाला यामध्ये काही मुद्दे तुमचे सुचवायचे असतील तर कमेंट मध्ये ते देखील मला सुचवू शकता आणि इतर कुठल्या विषयाबद्दल निबंध हवा असेल तर ते देखील कमेंट मध्ये कळवा मी तो निबंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करेल आणि तुमच्या कमेंट मला पुढचा लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.

See also  पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | Pitalya bhandyanche aatmakathan marathi nibandh

 धन्यवाद

Shetkaryache manogat marathi nibandh

  • shetkaryache manogat marathi nibandh
  • eka shetkaryache manogat marathi nibandh
  • dushkal grast shetkaryache manogat marathi nibandh
  • purgrast shetkaryache manogat marathi nibandh
  • shetkaryache manogat nibandh in marathi language
  • shetkaryache manogat nibandh marathi essay
  • marathi nibandh shetkaryache manogat
  • shetkaryache manogat nibandh marathi madhe
  • shetkaryache manogat nibandh marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.