झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Zaade Lava Desh vachava nibandh Marathi

 झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Zaade Lava Desh vachava nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण “झाडे लावा देश वाचवा” हा निबंध बघणार आहोत हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला उपयुक्त ठरेल.

आपण आजच्या निबंधामध्ये बघणार आहोत की झाडांचे महत्त्व काय आहे ?झाडामुळे प्रदूषण कशा प्रकारे कमी होते ?झाडापासून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळत असतात ?झाडांची संख्या कमी झाली तर कोणत्या समस्या उत्पन्न होतील? याचा विचार आपण या निबंधामध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjPUqsVy1Zhyz46EVm1L45R7dVW07QLzemMmO6P4Nq8Et_sn465fyBCrrG54avoMhKAhc7iwpOOvWawgYKTORbdSoguz0yhLw46h3flfqfyRi-FS2gwIzD0bJGmJ3NJWaW4sVSfX1-PV0bV8uNX3hIc4IkvPVVaAwi2N0z8_tZMTzItJfSqXbX-hePL/s320/images%20(10).jpeg


झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Zaade Lava Desh vachava nibandh Marathi

मनुष्य आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे आपल्या आजूबाजूला असणारी झाडे ही निसर्गाची शोभा वाढवत असतात वातावरणातील हवा शुद्ध करण्याचे काम झाड करत असतात व आपल्याला अनेक श्वसनाच्या आजारांपासून वृक्ष आपल्याला सुरक्षित ठेवत असतात झाडे पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतात ज्या भागात वृक्षांची संख्या जास्त आहे तिथे पाऊस जास्त पडतो आपल्या आजूबाजूला असणारे हे वृक्ष वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात व आपल्याला जीवनावश्यक असलेला ऑक्सिजन देतात.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

पक्षीही सुस्वरे | आळविती ||

येणे सुखरूचे एकांताचा वास |

नाही गुणदोष | अंगी येत ||

किती सुंदर ओव्या आहेत ना ! संत तुकाराम महाराजांनी अशा सुंदर शब्दात निसर्गाशी नाते सांगितले आहे.

औषधी गुणधर्म असलेला वृक्षांपासून आपल्याला वेगवेगळ्या आजारांवर औषधे उपलब्ध होतात निसर्गामधून आपल्याला असंख्य गोष्टी मिळत असतात त्यामुळे आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. झाडे लावण्यासाठी व त्यांचे पालन पोषण करण्यासाठी भरपूर वर्षाचा कालावधी लागतो परंतु ते झाड तोडण्यासाठी काही क्षण पुरेसे असतात वाढत्या लोकसंख्येमुळे व शहरीकरणामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे हे निसर्गचक्र व्यवस्थित चालण्यासाठी वृक्षांची संख्या वाढवणे गरजेचे आहे वाढते लोकसंख्येमुळे लोक झाडे तोडतात आणि तिथे त्यांचे घर बांधतात.

See also  प्रदूषणाने केला घात सर्वत्र झाली वाताहात निबंध | pradushanane kela ghat sarvatra zali vatahat Nibhand

वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे त्यांच्यामुळे बरेच आजार आपल्याला होत आहे श्वास घेण्यास शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही कारण की प्रदूषणात इतका आहे आपल्या गाड्यांचा वापर वाढला आहे कारखान्यातील घाण पाणी नदीत जाऊन मिळते ध्वनी प्रदूषण किती तरी प्रदूषण आपल्या या जगात उपलब्ध आहेत परंतु याचा मानवावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

जागतिक तापमान वाढ प्रदूषण पाऊस कमी प्रमाणात पडणे अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत पाऊस न पडल्यामुळे आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे हवेमधील विषारी वायूमुळे श्वसनाच्या तसेच अनेक वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे प्राणी पशुपक्षी मरत आहेत आजारी पडतात याला प्रदूषण हे एकच कारण आहे पण या सर्व समस्यांना देखील उपाय आहे ते म्हणजे झाड लावणे.

वृक्षारोपण करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच गरजेचे आहे म्हणजे लावलेले वृक्ष जपणे त्यांचे संगोपन करणे आपल्याला शक्य होईल तेवढे वृक्ष आपण लावले पाहिजेत वृक्ष संवर्धनासाठी अनेक अभियान राबवण्यात येतात एखादी गोष्ट लोकसहभागातून पूर्ण होते त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षांचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत शाळांमध्ये कॉलेजमध्ये वृक्षरोपणाचे कार्यक्रम आयोजित केले तर लहान मुलांना वृक्षांचे महत्त्व समजेल जागतिक तापमान वाढ अशा परिस्थितीत आपल्याला झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहेत झाडे लावा झाडे जगवा अशी आपण अनेक ठिकाणी ऐकले असेलच आपण जर लहानपणापासूनच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन केले नाही तर सर्वांचे अस्तित्व धोकातील “झाडे लावा देश वाचवा”.

आपण जर प्रत्येकाने एक जरी झाड लावले तरी आपला निसर्ग हिरव्या गार होऊन जाईल आपल्याला स्वच्छ हवा मिळेल व आपली पुढची पिढी अनेक समस्या मधून सुरक्षित राहील वृक्षारोपण करणे व त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे झाडांचे महत्त्व समजून घेऊन आपण वृक्षारोपण करण्यासाठी इतरांना प्रेरित केले पाहिजे आपण लावलेली झाडे आपल्याला फळे फुले देतील व आपल्याला सावलीही प्रदान करतील तसेच आपल्या पुढील पिढीला स्वच्छ वातावरण देतील स्वच्छ श्वास घ्यायला हवा देतील.


झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध | Zaade Lava Desh vachava nibandh Marathi

मित्रांनो मी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि जर या निबंध मध्ये काही चुका झाल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जर कमेंट केल्या तर मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते. 

See also  मी संगणक बोलतोय मराठी निबंध | me sanganak boltoy marathi nibandh

धन्यवाद

Zaade Lava Desh vachava nibandh Marathi

  • झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध
  • झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध लेखन
  • झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध दाखवा
  •  Zaade Lava Desh vachava nibandh Marathi
  • झाडे लावा देश वाचवा मराठी निबंध

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.