पाणीपुरी बनवण्याची रेसिपी | Pani Puri Recipe in Marathi
आपण सर्वजण पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर जातो आणि दहा रुपयांमध्ये फक्त पाच पुऱ्या खाऊन येतो आता तर पाणीपुरीचे भाव खूप जास्त वाढले आहेत आता वीस रुपयाला सहा पुरया भेटतात. पाणीपुरी बाहेर खाणं परवडत नाही परंतु आपल्याला बाहेरची पाणीपुरी इतकी आवडते ना की आपण आठवड्यातून एकदा तरी पाणीपुरी खायला जातो विशेषता मुलींना पाणीपुरी प्रचंड आवडते.
परंतु ही पाणीपुरी कशी बनते कशा पाण्यात बनते कशा अवस्थेत बनते याची जाणीव आपल्याला नसते काही काही लोकांना तर माहीत असतं पाणीपुरी कशी बनते किंवा ते लोक कुठलं पाणी युज करतात पण तू तरी देखील खूप सारे लोक पाणीपुरी खायला बाहेर जातात पण ते किती घाण पाण्यात ते पाणी बनवतात किंवा अस्वच्छ हाताने ते पुऱ्या बनवतात. याची जाणीव असून सुद्धा आपण बाहेर पाणीपुरी खातो आणि आपण सुद्धा आजारी पडतो.
आपल्या लहान मुलांना देखील आजारी पडतो कारण आपण त्यांना पाणीपुरी खायला घेऊन जातो ना परंतु आपल्या शरीराची आपल्याला काळजी असेल तर तुम्ही देखील बाहेर खायची पाणीपुरी बंद करा आणि स्वतः घरी पाणीपुरी हाताने बनवायला सुरुवात करतात आणि पाणीपुरी बनवून नाही काय खूप अवघड गोष्ट नाहीये पाणीपुरी ही 15 ते 20 मिनिटात बनले जाते जास्त वेळ लागत नाही पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीला जास्त वेळ लागत नाही आपण उगाचच कुठल्याही गोष्टीचा बाऊ करतो.
पाणीपुरी बनवण्याची रेसिपी | Pani Puri Recipe in Marathi
पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची?
चला तर मग सुरुवात करूया पाणीपुरी कशी बनवायची हे बघायला प्रथमता आपण बघणार आहोत की पाणीपुरीची पुरी कशी बनवायची?
पाणीपुरी बनवण्याची साहित्य : मैदा, गरा, मीठ,तेल
पाणीपुरी बनवण्याची कृती
१. एक वाटी मैदा घेणे आणि त्यामध्ये एक वाटी गळा घेणे हे मस्त असे मिक्स करून घेणे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकून पुन्हा एकदा याला मिक्स करून घेणे
२. आता तेलाचा थोडासा मोहन गरम करणे आणि ह्या पिठामध्ये टाकून मस्त असं आपल्या हाताने मिक्स करून घेणे पिठामध्ये
३. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं घट्ट पीठ मळून घेणे.
४. आता आपलं पीठ बनवून तयार आहे परंतु गऱ्याला भिजायला टाईम लागतो म्हणून आता याला एक ते दीड तास साईडला ठेवून द्यायचं झाकून.
५. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं
६. आता आपलं पीठ मस्त असे भिजले आहे आणि फुगलं देखील आहे कारण की गरामुळे पीठ फुगले जातं.
७. आता पोळपाटावर पिठाचा मस्त असा एक उंडा करून त्याला लाटून घेणे जास्त जाडसर देखील लाटायचं नाही आणि जास्त पातळ देखील लाटायचं नाही तर आपण जास्त पातळ पोराला वाटला तर पुऱ्या फुगणार नाही आणि जास्त जाड लागला तर पुऱ्या अशा कच्च्या राहतील त्यामुळे मीडियम लाटायच्या पुऱ्या आणि एक मोठी पोळी सारखं लाटून घेणे आणि मग क्लासच्या सहाय्याने त्याला आकार देणे गोल गोल कापून घेणे
८. ह्या पुऱ्या मीडियम फ्लेमवर तळत असलेला तेलामध्ये टाकून तळून घेणे.
९. पुऱ्या मस्त अशा फुगल्यानंतर त्याला काढून घेणे आणि एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवणे जेणेकरून त्या लूज होणार नाहीत आणि कुरकुरीत राहते.
आता आपण ही रेसिपी बघितली की पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या परंतु जर तुम्हाला पुऱ्या बनवणे अवघड वाटत असेल तर तुम्ही विकत पॅकेट आणू शकता पंधरा रुपयाला पाणीपुरीच्या पोरांचा पॅकेट भेटतो आणि त्यामध्ये तीच पुऱ्या फक्त तेलामध्ये टाकून तळायच्या असतात.
पाणीपुरी बनवण्याची रेसिपी | Pani Puri Recipe in Marathi
आता आपण बघणार आहोत पाणीपुरीसाठी पाणी कसं बनवायचं?
तिखट पाणी कसं बनवायचं?
सामग्री: कोथिंबीर,पुदिना,हिरवी मिरची, आल्ल,लिंबू, काळ मीठ
कृती:
१.कोथिंबीर आणि पुदिना मिक्सरमधून मस्त असा बारीक करून घ्यायचा.
२. त्यामध्ये पाणी घालून बारीक केलं तरी देखील चालेल आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आलं टाकायचे अर्ध लिंबू पिळायचं काळ मीठ टाकायचं आणि मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच.
३. आता या सगळ्या गोष्टींची बेस्ट एका पातेल्यामध्ये गाळून घ्यायची पाणी टाकून आणि तुम्हाला जितकं पाणी लागते तितकं पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता
आता आपला पाणीपुरीचं तिखट पाणी तयार आहे.
पाणीपुरी बनवण्याची रेसिपी | Pani Puri Recipe in Marathi
आता आपण बघणार आहोत की पाणीपुरीचे गोड पाणी कसं बनवायचं?
सामग्री: गूळ,चिंच,खजूर
कृती:
१. चिंच आणि खजूर पाणी टाकून मिक्सर मधून मस्त अशी बारीक घेणे.
२. आता पाटील यामध्ये पाणी उकळायला ठेवणे त्यामध्ये गूळ टाकणं
३. गुळ आणि पाणी मस्त असे एकजीव झाले की त्यामध्ये चिंच आणि खजुराची पेस्ट टाकायची आणि गॅस बंद करून टाकायचा आणि याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं आंबट गोड पाणी तयार आहे
अशी ही सर्व पाणीपुरीची रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे तुमच्या मुलांसाठी नक्की घरी बनवा आणि जरी रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये आवडली असेल तर मला नक्की कळवा. धन्यवाद
पाणीपुरी बनवण्याची रेसिपी | Pani Puri Recipe in Marathi
- pani puri recipe in marathi
- mumbai pani puri recipe in marathi
- how to make pani puri recipe in marathi
- pani puri recipe in marathi at home
- pani puri recipe in marathi video
- pani puri recipe step by step
- pani puri recipe at home
- pani puri bhaji recipe in marathi