पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन (pitalya bhandyanche aatmakathan marathi nibandh)
नमस्कार मंडळी पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन हा निबंध खूप वेळा पेपरमध्ये विचारला जातो तुमच्यासाठी हा निबंध मी घेऊन आले आहे मी आशा करते की हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर सुरुवात करूया पितळेच्या भांड्याचे आत्मकथन या निबंधाला.
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | Pitalya bhandyanche aatmakathan marathi nibandh
ऐकलं का रे भावांनो या घरात नवीन फर्निचर येणार आहे नवीन भांडे येणार आहे सगळं नवीन होणार आहे.अरे बापरे ! म्हणजे आपल्या उरल्या सुरल्या भावंडांना दुकानात विक्रीसाठी पाठवणार .घरात नव्या पद्धतीची भांडी आणायला हवीत असं आज काकू म्हणत होत्या. म्हणजेच आता आपल्या पितळ्या भांड्यांचा जमाना संपला, असे म्हणायला काही हरकत नाही .मला अजूनही आठवतंय कितीतरी वर्षान आधी आजींनी मला किती हौसेना आणलं होतं त्यांनी त्यांच्या शेळ्या विकल्या होत्या आणि त्या पैशातून मला विकत घेतलं होतं किती ती हाऊस त्यांना!
आजी मला स्वयंपाकासाठी पाणी साठवण्यासाठी वस्तू भरून ठेवण्यासाठी वापरायच्या आम्हाला स्वयंपाक घरात खूप मनाचे स्थान होतं. कारण की सगळीकडे चर्चा असायची पितळाच्या भांड्यात खाल्लेले चांगलं असतं. किंवा पितळी भांडी वापरलेले चांगले असतात. घरातल्या मस्त मस्त भाज्या जेव्हा आमच्यात शिजायच्या ना त्या वासाने आम्हाला देखील भूक लागायची धन्य धन्य वाटायचं. तेव्हा किती ते मजेचे दिवस होते जुने दिवस खरच सोन्याचे दिवस होते आणि किती मान होता तेव्हा आम्हाला. खरंच मजेचे दिवस होते ते.
सणासुदीला आमटी ,भात ,भजे, कुरडई, श्रीखंड ,बासुंदी ,मसाला दूध आणि आम्ही न्हाऊन जायचं. वांग्याची भाजी पंचामृत डाळीची आमटी या वासाने आम्ही तृप्त व्हायचं. खरं तर आम्हाला गरम चुलीवर पदार्थ गरम करण्यासाठी पुन्हा पुन्हा ठेवत आम्ही सारे लालबुंद होत असून पूर्ण गरम होत असून पण आलेले पाहुणे बोटे चाटून जेवले पाहिजे अशी आमची देखील इच्छा असायची आणि आजीचा समाधानी चेहरा पाहताना आम्हाला खूप बरं वाटायचं आजी आमची उत्तम बडदास्त ठेवत असे मस्त घासायची पितांबरीने धुवायची कधीही आम्हाला असं उष्ट ठेवलं नाही. आम्हाला दर दोन दिवसांनी चिंच मीठ लावून लक्ख घासून घ्यायची आणि स्वयंपाक घरातली जी मांडणी असायची ती देखील आमच्यामुळे उठून दिसायची.
वर्षातून एकदा का होईना आमची वरात घराच्या बाहेर निघायची कारण दिवाळीला सर्व भांडे स्वच्छ घासून निघायचे तेव्हा आम्हाला सर्वांना बाहेर न्यायची आजी आणि मस्त धुऊन काढायची. आता स्वयंपाकाचे देखील किचन झाले पितळाच्या भांड्यांच्या जागी स्टीलचे भांडे आले काचेची भांडी तर कपाटात अशी जागा धरून बसलेली आहेत पण आम्हालाही आशा आहे लोकांना परत चुलीवरचे जेवण आवडायला लागेल आणि आमचा पितळी भांड्यांचा जमाना पुन्हा परत येईल.
पितळेच्या भांड्यांचे आत्मकथन | Pitalya bhandyanche aatmakathan marathi nibandh
मित्रांनो जर ही आजची पोस्ट मला आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आजच्या पोस्टमध्ये काही चुका झाल्या असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमच्या कमेंट वाचून मला पुढची पोस्ट बनवायला प्रोत्साहन मिळते .
धन्यवाद