माझे बालपण मराठी निबंध | Majhe Balpan Essay in Marathi

माझे बालपण मराठी निबंध | Majhe Balpan Essay in Marathi

माझे बालपण मराठी निबंध | Majhe Balpan Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण माझे बालपण या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत या विषयावर निबंध खूप वेळ परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला माझे बालपण मराठी निबंध

माझे बालपण मराठी निबंध | Majhe Balpan Essay in Marathi

जेव्हा मी कुठल्या लहान मुलांना खेळताना बघते तेव्हा मला माझे बालपण आठवतं माझ्या बालपणीच्या सर्व आठवणी जाग्या होतात आणि त्याच आठवणींमध्ये मी काही काळ हरवून जाते मला माझे बालपण पूर्णच आठवत नाही परंतु थोडाथोड्या गोष्टी मला आठवतात आणि त्या थोड्या थोड्या गोष्टीच मला काही काळ सुख देतात. खूप साऱ्या आठवणींनी माझे बालपण सजले आहे.

आत्ताच्या लहान मुलांना मोबाईल मध्ये गेम खेळताना पाहिलं की मला माझ्या बालपणाची आठवण येते माझे बालपण या आताच्या नवीन मुलांपेक्षा खूप वेगळे होते कारण आत्ताची मुले दिवसभर मोबाईल मध्ये गेम खेळत असतात किंवा युट्युब बघत असतात आणि आत्ताच्या मुलांना मैदानी खेळ म्हणजे काय हे सुद्धा माहित नाहीये मला असं वाटतं की आपल्या वेळेचे बालपण खूप छान होते.

मी लहान होतो तेव्हा माझ्या मित्रांसोबत खूप खेळायचो मोबाईल म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं कारण तेव्हा मोबाईल नव्हतेच होते परंतु बटनचे मोबाईल होते. आणि मोबाईल नसल्याकारणाने आम्ही मैदानी खेळ खूप खेळायचो. आम्ही आमच्या बालपणी लपाछपी, खो-खो ,कबड्डी, विटी दांडू, सुर पारंब्या ,आट्यापाट्या असे खूप सारे खेळ खेळायचो.

मित्रांसोबत बालपण कसे गेले हे मला कधी समजलेच नाही शाळेतला पहिला दिवस मला अजूनही चांगल्या प्रकारे आठवतो पहिल्या दिवशी मी शाळेत जाण्यास नकार देत होतो रडत होतो परंतु त्यानंतरही मला शाळेत बसवलं आणि शाळेत बनलेल्या मित्रांसोबत खूप मज्जा तसेच अभ्यासही केला मोठा झाल्यावर असं वाटतं की बालपण किती सुंदर आणि आनंदी होत आणि लहानपणी वाटायचं की कधी मोठा होतो एकदाच आणि आता मोठे झाले वाटते लहानपण किती मस्त होतं.

See also  माझे गाव ३०० शब्दांत मराठी निबंध-300 Words on my village essay in Marathi

लहानपणी आपल्याला कोणी ओळखत नव्हतं काही काम सांगत नव्हतं शाळेतून आल्यावर दप्तर खाली ठेवलं की लगेच खेळायला जायचं खेळून थकले की घरी यायचं जेवण करायचं थोडा वेळ गप्प बसायचं आणि झोपून घ्यायचं सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आणि शाळेत जाऊन मित्रांसोबत मज्जा करायची लहान असल्यामुळे सर्व जण हट्ट पुरवायचे आणि हळूहळू जसजसं मोठे होऊ लागले तसं तसं आनंद कमी कमी होऊ लागला पाचवी नंतर लहान पण कमी झाला आणि दहावीपर्यंत अभ्यासाच्या दबावामुळे खेळायला टाईमच मिळत नव्हता असे हे माझे बालपण संपले परंतु मी माझे बालपण खूप आनंदी आणि मजेत जगले आहे

माझे बालपण मराठी निबंध | Majhe Balpan Essay in Marathi

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली माझे बालपण या विषयावर आम्ही तुमच्यासाठी निबंध लिहिलेले आहेत येत्या काळामध्ये अजून माझे बालपण मराठी निबंध या विषयावर तुमच्यासाठी नवीन पद्धतीने निबंध घेऊन येईल आणि तुम्हाला या निबंधामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली किंवा काही चुकीचं वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद

Related searches

  • majhe balpan essay in marathi
  • माझे बालपण
  • majhe balpan
  • marathi majhe baba nibandh
  • essay on majhe baba in marathi
  • majhe balpan marathi nibandh
  • prasang lekhan majhe balpan
  • majhe balpan nibandh
  • majhe balpan nibandh marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.