मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध | Me Kridangan Boltoy Marathi Nibandh
नमस्कार मित्रांनो आज आपण ” मी क्रीडांगण बोलते मराठी निबंध” या विषयावर निबंध लिहिणार आहोत या विषयावर निबंध सर्वच इयत्तांमध्ये विचारला जातो आणि हा एक निबंध असा आहे जो सर्व इयत्तांमध्ये विचारला जातो आणि शंभर टक्के विचारला जातो त्यामुळे मला असं वाटतं की हा निबंध तुम्ही पेपरला जाण्याच्या आधी एकदा वाचून घ्यावा आणि मग पेपरला जावा आणि मी अशी अपेक्षा करते की ” मी क्रीडांगण बोलतोय” हा मराठी निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला.
मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध | me kridangan boltoy Marathi nibandh
नमस्कार मित्रांनो अरे इकडे तिकडे पाहू नका बावरू नका. तुम्ही आता जिथे उभे आहात ना ते मैदानच मी तुमच्याशी बोलत आहे. घाबरलात ना. पण अरे खरच मीच बोलतोय. तुम्ही खेळण्यासाठी तुमच्या मित्रांची वाट पाहत आहात ना?म्हणलं, ते येईपर्यंत तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्यात म्हणून तुम्हाला हाक मारली!
बाळांनो इथे माझा जन्म झाला तोच मुळी तुमच्यासाठी काही वर्षांपूर्वी येथे अवतीभोवती खूप इमारती उभा राहू लागल्या होत्या लोकवस्ती भराभर वाढत चालली होती लोकांच्या लक्षात आले की हजारो माणसे इथे राहणार पण त्यांच्या मुलांसाठी खेळायला साधं मैदान नाही काहीजणांनी मग प्रयत्न केले काहीजणांनी हातभार लावला आणि त्यातून माझा जन्म झाला.
मी खूप मोठं कार्य करतो तुम्हाला माहित आहे का मुलांच्या खेळण्यासाठी सोय तर मी केलेलीच आहे शिवाय माझ्या काठाकाठाने मोठे मोठे डेरेदार वृक्ष डवलात उभे आहेत या परिसराचे मोठं वैभव आहे ते. संध्याकाळी लहान मुलं माझ्या जवळ येतातच पण बायका सुद्धा येथे विरंगुळ्यासाठी येतात. सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी खूप सारे जवान मुलं येतात ज्येष्ठ नागरिक येतात आणि व्यायाम करून जातात. इमारतींनी भरलेल्या या परिसरात ही माझी जागा तेवढी मोकळी आहे. काहीजण त्यामुळेच हे मैदान म्हणजे यात परिसराचा ‘ फुफ्फुस’ आहे असे म्हणतात .केवढा हा माझा सन्मान.
मुलांनो, तुम्ही माझ्याजवळ आलात की मी खूप खुशीत असतो. तुमच्यासारखे लहान लहान खूप मुलं यावी तसेच मला वाटत असतं. माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत शेकडो नव्हे हजारो मुलं इथं खेळून गेले असतील तुम्हाला ठाऊक नसेल कदाचित वाडेकर,गावस्कर ,वेंगसकर ,तेंडुलकर वगैरे खेळाडू नावाजलेले नव्हते तुमच्यासारखे साधे विद्यार्थी होते तेव्हा तेथे माझ्या अंगा खांद्यावर खेळले आहेत मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. कधीही त्यांची नाव ऐकलेत की उर भरून येते.
परंतु अलीकडे मला त्रास होऊ लागला आहे काही दृष्ट लोक माझी लचके तोडत आहेत मला बळकवण्यासाठी कारस्थान चालू आहे शिवाय सगळेच येऊन येथे घाण करतात सकाळी तर दुर्गंधी पसरते फेरीवाले भिकारी यांनाही माझे लचके तोडण्याचे काम चालू ठेवला आहे काहीजण इथली झाडही कारण तोडत असतात असे दूरदर्शन राहण्यापेक्षा माझा उपयोग फक्त मुलांना खेळण्यासाठी असेल असा कायदा केला तर किती बरं होईल?
मित्रांनो मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि या निबंध मध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते आणि तुम्ही हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करायला मदत होईल.
धन्यवाद
मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध | Me Kridangan Boltoy Marathi Nibandh
- मी क्रीडांगण बोलतोय मराठी निबंध
- me kridangan boltoy Marathi nibandh
- क्रिडांगणाचे मनोगत
- autobiography of playground in Marathi
- क्रिडांगणाचे आत्मवृत्त
- me kridangan boltoy marathi nibandh
- me kridangan boltoy nibandh in marathi
- me kridangan boltoy essay in marathi
- me kridangan boltoy atmakatha in marathi
- mi kridangan boltoy marathi nibandh
- mi kridangan boltoy nibandh
- mi kridangan boltoy essay in marathi
- marathi nibandh mi kridangan boltoy