राजा आणि संत मराठी बोधकथा | छोटी बोधकथा व तात्पर्य pdf
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
मराठी बोधकथा: राजा आणि संत
एका जंगलामध्ये दोन संत राहत होते एकांत तापल्या तपश्चर्येत मग्न राहत होते. कधीतरी यात्रेकरू तिथून जायचे तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असतात. त्याच यात्रेकरू कडून तेथील राजाला त्या दोन संतांची माहिती मिळाली राजा त्या दोघांना भेटण्यास निघाला जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्यांनी आपला चांगुलपणा पाहिला तर तो आपणाला भेटण्यास येईल त्याचबरोबर अनेक माणसे येतील त्या माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व आशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपण ध्यान साधना करू शकणार नाहीत.
राजा आम्हाला दोघांना साधा माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजा व काही माणसे तिथे पोहोचले तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाथा काठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते पहिल्या संताने दुसऱ्याला म्हणले तू स्वतःला कोण समजतोस मी इतके ज्ञान मिळवले आहे की तू ते सात जन्मातही मिळू शकणार नाही दुसरा संत त्यावर म्हणाला अरे तू तर पक्का खोटारडा आहेस तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलांना फसवू शकशील पण मला नाही.
तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे राजाने व राजा बरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधुसंत तर सामान्य माणसांप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधुसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले राजावर आलेले लोक जाताना दोन्ही संतांकडे रागाने पाहिले. आणि दोन्ही संतांनी एकमेकांकडे बघून स्मित हास्य केले व गळाभेट घेतली दोन्हीही साधू आपल्या साधने मध्ये मग्न झाले.
मराठी बोधकथा तात्पर्य: चांगली गोष्ट घडून आणण्यासाठी कधी कधी चुकीच्या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.
मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद