वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal Tr Vachal Marathi Nibandh

 वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh 

नमस्कार मित्रांनो आज आपण “वाचाल तर वाचाल “या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. मी आशा करते की तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

आपण असे निबंध मध्ये वाचन का बर केले पाहिजे?वाचन करणे का गरजेचे आहे? किंवा वाचन का केले पाहिजे? वाचन करण्याचे काय फायदे आहेत? हे बघणार आहोत. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या निबंधातून सोडवणार आहोत.

अशा प्रकारचा निबंध परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh

वाचाल तर वाचाल,

हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य विचार आहे आणि हा विचार आपल्या सर्वांसाठीच अतिशय मोलाचा आहे.”वाचाल “या शब्दातच आपल्या वाचनाचे महत्त्व समजून जाते. जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना असेल तर यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही.

आणि ज्ञान आणि वाचनाचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या ज्ञान हवं असेल तर ते दुसरीकडून कुठूनच नव्हे तर पुस्तकातून भेटतं. त्यासाठी पुस्तक वाचावं लागतं म्हणजेच पुस्तक वाचणे देखील खूप गरजेचे आहे. आणि आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला सर्वांच्या पुढे जाण्यासाठी वाचनाची खूप आवश्यकता आहे.

वाचनाचे सवयीमुळे माणसाची आयुष्य घडते. त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. ऐतिहासिक गोष्टींचे ज्ञान मिळते. आत्ताच्या आधुनिक जगात ज्ञान मिळवण्याची भरपूर साधने आहेत. तुला जर वाचनाचा कंटाळा येत असेल तर तुम्ही मोबाईलवर देखील पुस्तकाचा आवाज ऐकू शकतो. तू वाचन हे एक महत्त्वाचे साधन आहे.

वाचन आपल्यापासून कोणीच कधीच वेगळं करू शकत नाही. जणू माणूस आणि पुस्तक हे एकमेकांचे मित्रच. वाचनामध्ये संपूर्ण जग पूर्ण हलवून टाकायची ताकद आहे.

See also  माझे गाव मराठी निबंध | Maze Gav Marathi Nibandh

आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण काही ना काही कारणावरून नकळत कितीतरी गोष्टी वाचतो. वाचन करणे ही खूप चांगली सवय आहे आणि ही सवय सर्वांनाच लागली पाहिजे. खूप जणांना वाचन करायची सवय असते आणि त्यांचा वेळ असा वाया जात नाही त्यांचा वेळ हा अमूल्य वेळ ठरला जातो. खूप लोकांनी वाचन करून त्यातून ज्ञान मिळून आयुष्यात मोठे यश मिळवले आहे.

आणि एखाद्या गोष्टीत जर यश मिळवायची असेल तर आपल्याला त्याबद्दलची ज्ञान असणे खूप आवश्यक आहे आणि ते ज्ञान मिळते ते म्हणजे वाचनातून. वाचनामुळे आपल्या ज्ञानाची ज्ञानगंगा भरभरून वाहू लागते. आजकालच्या लोकांचे वेळ सर्व कामात जातो त्यामुळे त्यांना वाचायला मिळत नाही परंतु जर एखाद्याला खरंच वाचनाची आवड असते तर तो कामानंतर देखील पुस्तक वाचतो आणि हाच तो यशस्वी माणूस.

जर आपलं वाचून चांगलं असेल तर आपण आपले मुद्दे पुढच्याला न घाबरता व्यवस्थित समजावून मांडून सांगू शकतो. आपण इतरांशी संवाद करू शकतो परंतु त्यासाठी आपलं वाचन जास्त पाहिजे. वाचनामुळे आपले शब्द संपत्ती वाढते आणि मेंदूला देखील चालना मिळते. वाचनामुळे आपले ताणतणाव दूर होतात. ऐतिहासिक गोष्टी वाचल्या की आपल्या अंगात वीज संचारल्यासारखी ताकद येते आणि आपण पुन्हा कामाला लागतो. कारण ऐतिहासिक गोष्टी खूप शौर्याच्या असतात. 

आपल्या भारतात वाचन करण्यासाठी कधीही न संपणारा खजिना उपलब्ध आहे परंतु आपण त्याचा वापर करत नाही. लहानपणापासूनच जर वाचायची सवय असेल तर जीवनात होणारे चांगले परिणाम हळूहळू दिसून येतात. इंटरनेटवर प्रत्येक मिनिटाला नवनवीन माहिती उपलब्ध होत असते ही नवनवीन माहिती अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते पण आपण ती माहिती वाचतो का?

वाचनाचे खूप फायदे आहेत त्यामुळे आपण ती माहिती वाचलीच पाहिजे आणि वाचनामुळे आपल्या विचारांमध्ये खूप सारे बदल घडतात. चांगले बदल घडतात. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते .रोज येणाऱ्या नवनवीन माहिती मध्ये बातम्या ,नोकरी, योजना ,शैक्षणिक माहिती तसेच जगात नेमकं काय चालले आहे हे आपल्याला वाचता येते. वाचन करण्यामुळे आपली शब्द सामग्री वाढते त्यामुळे आपण पुढच्या सोबत चांगला संवाद करू शकतो.

See also  महात्मा गांधी पर निबंध - Mahatma Gandhi Essay [ HINDI ENGLISH ]

जर आपण माहिती वाचत असेल तर आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात म्हणूनच वाचन हे आपल्याला आयुष्यात खूप उपयुक्त ठरते. चला तर मग आज पासून वाचायला सुरुवात करूया आपल्यापासून… ‘वाचाल तर वाचाल’


तुम्ही या निबंध साठी असेही शीर्षक देऊ शकता:

१. वाचनाचे फायदे मराठी निबंध

२. वाचनाचे महत्त्व मराठी निबंध

३. वाचन संस्कृती काळाची गरज निबंध

४. वाचाल तर वाचाल मराठी निबंध


वाचाल तर वाचाल निबंध मराठी । Vachal Tar Vachal Marathi Nibandh

मित्रांनो मी अशी आशा करते की “वाचाल तर वाचाल” हा निबंध तुम्हाला आवडला असेल. आणि हा मग निबंध मध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता मी त्या चुका नक्की सुधारेल.

आणि निबंध आवडला असेल तरी कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट वाचून मला प्रोत्साहन भेटते पुढचा लेख लिहायला.

धन्यवाद

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh

  • vachal tr vachal marathi nibandh
  • vachate
  • marathi nibandh vachal tar vachal
  • vachal tar vachal marathi nibandh lekhan
  • vachal tar vachal marathi nibandh
  • वाचाल तर वाचाल मराठी निबंध
  • वाचाल तर वाचाल निबंध लेखन मराठी
  • वाचाल तर वाचाल निबंध

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.