श्री गणेश पूजा | Shree Ganesh Pooja | गणेश चतुर्थी पूजा मंत्र

 श्री गणेश पूजा | Shree Ganesh Pooja | गणेश चतुर्थी पूजा मंत्र

श्री गणेश पूजा | Shree Ganesh Pooja | गणेश चतुर्थी पूजा मंत्र

 श्री गणेश पूजा | Shree Ganesh Pooja | गणेश चतुर्थी पूजा मंत्र

श्रीगणेशपूजा


आपण योजलेली मंगलकार्ये निर्विघ्नपणे पार पडावीत म्हणून श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची चाल आपल्यात आज कैक वर्षे चालू आहे. श्रीगणेशचतुथीच्या दिवशी (भाद्रपद शुद्ध चतुर्थी) प्रातः स्नानसंध्या पूजादि नित्यविधि करावे. 

घरामधील जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसरून त्यावर श्रीगणपतीची मूर्ती स्थापना करावी व शुचिर्भूतपणें आसनावर बसवून द्विराचमन प्राणायामादि केल्यावर ‘जरपरमेश्वरप्रीत्यर्थं पार्थिवगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकलप म्हणून पाणी सोडावे. 

कलश, शंख, घंटा व दीप यांना गंध-अक्षता पुष्प अर्पण करावे. नंतर गणपतीच्या नेचांना दुर्वेने तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठेचे पुढील मंत्र म्हणावे

अस्यै प्राणाः प्रतिष्ठतु अस्यै प्राणा: क्षरन्तु च
अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कथन । । १ । 
रक्तांभीधिस्थपोपोल्लसदरुणसरोजाधिरूढाकराब्जै। 
पाशं कोदंडभिक्षुद्भवमथ गुणमप्यंकुशं पंचबाणान् ।।

विभ्राणासुकपालं त्रिनयनलासिता पीनवक्षोरुहाया। 
देवी बालार्कवर्णा भवतु सुखकारी प्राणशक्ति : परानः ।। २ ।।

अशी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मूर्तीला नमस्कार करून
एकदंतं शूर्पकर्ण गजवक्त्रं चतुर्भुजं ।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकम् ।।३।।

ध्यायेदेवं महाकायं पप्तकांचनसंनिभं । 
चतुर्भुजं महाकायं सर्वाभरणभूषितम् ।।४।।

दंताक्षमालापरशुपूर्णमोदकहस्मकं ।
मोदकासक्तशुंडाग्रमेकदंतं विनायकम् ।।५।।

हे श्ोक म्हणत असता अंतःकरणांत गणेशमूर्तीचे ध्यान करावे
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर । 
अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक ।।६।।

श्रीसिद्धिविनायकाय नमः । आवाहयामि ।। 
असे म्हणून मूर्तीला आवाहनसूचक अक्षता अर्पण कराव्यात.  
विचित्ररत्नरचितं दिव्यास्तरणसंयुतं ।
स्वर्णसिंहासन चारु गृहाण सुरपूजित।।७।। 

श्रीसिद्धिविनायकम नमः । आसनार्थ अक्षतां समर्पयामि ।
असे म्हणून मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण कराव्यात. 
सर्वतोर्थसमानीतं पाद्यं गंधादिसंयुतम् ।
 विघ्नराज गृहाणेदं भगवन् भक्तवत्सल । । ८ । 

श्रीसिद्धिविनायकाय नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। 
असे म्हणून मूर्तीच्या पायांवर फुलाने पाणी अर्पण करावे.
अध्यं च फलसंयुक्त गंधपुष्पाक्षतैर्युतम् ।। 
गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे।।९।।

श्रीसिद्धिविनायकाय नमः । अध्यं समर्पयामि ।
असे म्हणून पळीभर पाण्यांत गंध, अक्षता पुष्प व -पाणी फुलाने मूर्तीला अर्घ्य म्हणून अर्पण करावे.
सुपारी ठेवून त्यांतले
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवंदित । 
गंगाहतेन तोयेन शीघ्रमाचमनं कुरु । १० ।। 

श्रीसिद्धिविनायकाय नमः । आचमनीयं समर्पयामि।
असे म्हणून मूर्तीच्या हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करावे.
गंगादिसर्वतीर्थेभ्य आनीत तोयमुत्तमं ।
भक्त्या समर्पितं तुभ्यं स्नानाया भीष्टदायक ।। ११ ।। 

श्रीसिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि। 
असे म्हणून मूर्तीला स्नान घालण्याची कल्पना करून मूर्तीवर फुलाने
पाणी अर्पण करावे.
पयोदधितं चैव मधुशर्करया युतं ।
पंचामृतेन स्नपनं प्रीयतां परमेश्वर ।। १२ ।। 

श्रीसिद्धिविनायकाय नमः । पंचामृतस्नानं समर्पयामि ।
असे म्हणून दूध, दही, तूप, मध व साखर ही फलाने निरनिराळी किंवा एकत्र मूर्तीवर अर्पण करावी आणि त्यानंतर स्वच्छ पाणी अर्पण करावे. याच स्नानप्रसंगी सुगंधी अत्तरे, गरम पाणी ही देखील अर्पण करावी व गणेशथर्वशीर्ष किंवा गणपतिविषयक अन्य स्तोत्रे अथवा देवांची स्तोत्रे म्हणावीत.
रक्तवस्त्रयुगं देव दिव्यं कांचनसंभवम् । सर्वप्रदं गृहाणेदं लंबोदर हरात्मज । १३ ।। 

श्रीसिद्धिविनायकाय नमः । वस्त्रं समर्पयामि । 
असे म्हणून मूर्तीला वस्त्र अर्पण करावे. राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनं चोत्तरीयकं । 
गृहाण चारु सर्वज्ञ भक्तांना वरदो भव ।। १४ ।।
 
श्रीसिद्धिविनायकाय नमः । यज्ञोपवीतं समर्पयामि । 
असे म्हणून यज्ञोपवीत (जानवे) मूर्तीला अर्पण करावे. हे जानवे मूर्तीच्या डाव्या खांद्यावरून उजव्या हाताखाली असे घालावे. कस्तूरीरोचनाचंद्रकुंकुमैश्च समन्वितम् ।। 
विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् ।। १५ ।। 

श्रीसिद्धिविनायकाय नमः । चंदनं समर्पयामि । 
असे म्हणून मूर्तीच्या मस्काला चंदन लावावे. रक्ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन ।
 ललाटपटले चंद्रस्तस्योपरि विधार्यताम् ।। १६ ।। 

श्रीसिद्धिविनायकाय नमः । अक्षतां समर्पयामि । 
असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. माल्यादीनी सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो । 
मयाहतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगुह्यताम् ।।१७।।

श्रीसिद्धिविनायकाय नमः पुष्पाणि समर्पयामि । 
असे म्हणून अनेक प्रकारची सुवासिक व शोभिवंत फुले, दुर्वा व शमी, आघाड इत्यादि पवित्र वनस्पतींची पाने गणपतीला अर्पण करावीत. 
दशांग गुग्गुलं धूपं सुगंधं च मनोहरं ।
गृहाण सर्वदेवेश उमापुत्रं नमोऽस्तु ते १८ ।।

 श्रीसिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि । 
असे म्हणून डाव्या हाताने घंटा वाजवून उजव्या हाताने धूप लावून किंवा उदबत्त्या लावून त्या मूर्तीसमोर ओवाळाव्यात.
सर्वज्ञ सर्वलोकेश त्रैलोक्यतिमिरापह । गृहाण मंगलं दीपं रुद्रप्रिय नमोऽस्तु ते । । १९ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि ।
असे म्हणून निरांजन लावून ते मूर्तीसमोर ओवाळावे.
नैवेद्यं गृह्यातं देव भक्तिं मेाचलां कुरू । 
ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। २० ।।

श्रीसिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि ।
असे म्हणून नैवेद्यं दाखवावा.
पूगीफलं महाद्दिव्यं नागवल्ल्या समन्वितं ।
कर्पूरेलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ।। २१ ।।

श्रीसिद्धिविनायकाय नमः । पूगीफलंतांबूल समर्पयामि ।
असे म्हणून विडा अर्पण करावा.
गणधिप नमस्तेऽतु उमापुत्राघनाशन । 
एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन ।। २२ ।।

विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिदायक ।
कुमारगुरवे नित्यं पूजनीयाः प्रयत्नत: ।। २३ ।।

हे मंत्र म्हणून एकवीस दुर्वा गणपतीला अर्पण कराव्यात. नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।
साष्टाङ्गोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ।। २४ ।।

असा मंत्र म्हणून गणपतीसमोर साष्टांग नमस्कार घालावा. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ।। २५ । ।

असा मंत्र म्हणून गणपतीला प्रदक्षिणा घालावी किंवा घरात तशी जाग
नसेल तर गणपतीसमोर उभे राहून आपण आपल्या सभोवती आपल्य उजव्या हाताकडून फिरावे.
असे म्हणून फुले अर्पण करावीत, अशी पूजा झाल्यावर हात जोडून प्रार्थना करावी. यन्मयाचरितं देव व्रतमेतत्सुदुर्लभम्
गणेश त्वं प्रसन्न : सन् सफलं कुरू सर्वदा ।। २७ ।।

विनायक गणेशान सर्वदेवनमस्कृत ।
पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नान्निवारय ।। २८ ।।

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं ।
पूजा चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर । २९ ।।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।। ३० ।

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर ।। ३१ ।।

अशी प्रार्थना झाल्यावर पुष्पांजली अर्पण करावी.
इति पूजाविधि

गणपतिविसर्जनपूजा

श्रीगणपतीचे विसर्जन कुलाचाप्रमाणे योग्य अशा दिवशी करावे . त्यावेळी गंध, फुले, धूप, नैवेद्य, दक्षिणा वगैरे उपचारांनी पूजा करावी. प्रत्येक उपचार अर्पण करताना त्या उपचारांचे वरील मंत्र म्हणावे किंवा “सिद्धिविनायकाय नमः ।” असे म्हणावे. पूजा झाल्यावर प्रार्थना करावी; व विसर्जनासाठी यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।

इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
असा मंत्र म्हणून अक्षता मूर्तीला अर्पण कराव्यात . म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने
आलेले देवत्व विसर्जन होते त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी आणि मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुलाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जन करावे.. सर्व पूजासमयी देवाला अर्पण केलेले वस्त्र, फल, दक्षिणा वगैरे पदार्थ ब्राह्मणाला अर्पण करावेत.

गणपतीची आरती

सुखकर्ता दुःखहर्ता


सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||१|| जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।। ० ।। रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।। चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरेजडित मुगुट शोभतो बरा रुणझुणती नूपु चरणी घागरिया।। जय ।।२।। लंबोदर पितांबर फणिवरबंधना ।। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटीं पावावें निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।। दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।३।।

२. गणराजाची आरती शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको हाथ लिए गुडलड्डु साई सुरवरको महिमा कहे न जाय लागत हूं पदको ।। १ ।। जय जय जी गणराज विद्या सुखदाता ।। धन्य तुमारो दर्शन मेरा मन रमता ५० अटीसिद्धी दासी संकटको बैरी। विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी कोटीसुरजप्रकाश ऐसी छवि तेरी ।। गंडस्थल मदमस्तक झुले शशिबिहारी।। जय ।।२।। भावभगति से कोई शरणागत आवे।। संतत संपत सबही भरपूर पावे।। ऐसे तुम महाराज मोको अति भावे।। गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ।। जय ० ||३||

३. मंगलमूर्तीचा आरती नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रे लाडू मोदक अन्नं परिपूरित पात्रं । ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्र अष्टहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ।। १ ।।
 जय देव जय देव जय मंगलमूर्ती।। तुझे गुण वर्णाया मज कँची स्फूर्ती।। जय०।। धृ० ।।
 तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती।। वाजी वा शिबिका सेवक सुत युवती ।। सर्वहि पावुनि अंती भवसा तरती।। जय देव०।।२।। 
शरणागत सर्वस्वें भजती तव चरण कीर्ति तयांची राहे जोंवर शशितरणी। त्रैलोक्यीं ते विजयी अद हे करणी।। गोसावीनंदन रत नामस्मरणीं ।। जय देव जय जय० ।३।।

४. गणपतीबाप्पाची आरती


तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्नविनाशक मोरया। संकटी रक्षी शरण तुला मी, गणपतीबप्पा मोरया ।। ध० ।। मंगलमूर्ति तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक ।

तुझिया दारी आज पातलों, देई चित्त मज ध्याया । । १ । । तू सकलांचा भाग्यविधाता, तू विद्येचा स्वामी दाता । ज्ञानदीप उजळून आमुचा, निमवी नैराश्याला ।। २ ।।

तूं माता, तूं पिता जगीं या । ज्ञाता तूं सर्वस्व जगीं या । पामर मी वर उणे भासती, तुझी आरती गाया । ३ । मंगलमूर्ति मोरया । गणपतीबाप्पा मोरया ।।

५. मोरयाची आरती गजानना श्रीगणराया। आधीं वंदू तुज मोरया ।। मंगलमूर्ती श्रीगणराया । आधी वंदू तुज मोरया । । १ । । –

सिंदुरचर्चित धवळे अंग । चंदन उटी खुलवी रंग ।। बघता मानस होते दंग। जीव जडला चरणीं तुझिया । । २ । । गौरीतनया भालचंद्रा । देवा कृपेच्या तू समुद्रा ।

  • गणेश पूजा विधि मराठी PDF
  • श्री गणेश पूजा विधि मराठी
  • घर पर गणेश जी की पूजा कैसे करें
  • गणेश जी की पूजा मंत्र
  • गणेश पूजा विधि मंत्र सहित
  • गणेश पूजा मंत्र इन संस्कृत
  • गणेश पूजन मंत्र PDF
  • गणेश पूजन मंत्र MP3
See also  Mangal Murti ki Arati | मंगलमूर्तीचा आरती

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.