संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi

संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi

नमस्कार मित्रांनो आपण संगणक आजच्या जगात खूप वापरतो आज त्या संगणक बद्दल आपण माहिती बघणार आहोत कारण संगणक बद्दल माहिती आपल्याला परीक्षेमध्ये खूप वेळा विचारले जाते निबंध लिहीण्यासाठी चला तर मग सुरु करत आपल्या आजच्या विषयाला ” संगणक मराठी निबंध”

संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi


संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

संगणक हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे आपल्याला जगभरातील लोकांशी जोडते. संगणकामध्ये माऊस,मॉनिटर ,सीपीयू ,कीबोर्ड असतात. संगणक माहिती इनपुट म्हणून घेतो आणि डेस्कटॉप वर आउटपुट म्हणून माहिती दाखवतो. संगणक विविध कारणांसाठी वापरला जातो हेच सॉफ्टवेअर दस्तऐवज पावत्या याद्या इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाते. संगणकावर आपण गेम खेळू शकतो गाणे ऐकू शकतो चित्रपट पाहू शकतो कार्यक्रमाने गणना सोडवण्यासाठी देखील वापरू शकतो.

संगणक हा शब्द लॅटिन शब्द ‘ computare’ या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ आहे “गणना”. संगणकाचा शोध प्रोग्राम शोधण्यासाठी आणि गणना करण्यासाठी लावला. संगणक प्रोग्राम सोडवण्यासाठी विकसित झाले आहे. शैक्षणिक क्षेत्रे वैद्यकीय क्षेत्रे संशोधन इत्यादी विविध क्षेत्रात संगणकाचा वापर केला जातो. संगणक एक शक्तिशाली कार्य करू शकतात आणि म्हणूनच आपले प्रयत्न कमी केले आणि आपले जीवन सोपे केले. संगणक हे खूप शक्तिशाली यंत्र आहे जे जगभरातल्या अडचणी सोडवू शकतो.

संगणक निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Computer in Marathi

१. संगणक वर आपण खूप कामे करू शकतो.

२. संगणक वर आपण चित्र काढू शकतो.

३. कीबोर्डच्या सहाय्याने संगणकावर आपण टायपिंग देखील करू शकतो.

४. संगणकावर इंटरनेट द्वारे आपण एकमेकांसोबत संवाद साधू शकतो माहितीची देवाण-घेवाण करू शकतो.

५. छोट्या संगणकास लॅपटॉप म्हणतात आणि तो आपल्या दप्तरांमध्ये ठेवता येतो.

६. माझ्या शाळेत खूप संगणक आहेत त्यावर आम्ही खूप सारे चित्र काढतो.

See also  इंदिरा गांधी पर हिन्दी निबंध | Essay on Indira Gandhi in Hindi

७. आम्ही संगणकाच्या तासाला त्यावर चित्र काढतो खेळ खेळतो नवनवीन विषय बघतो.

८. मी ईमेल द्वारे माझ्या मित्रांशी संवाद साधते

९. संगणकामध्ये मॉनिटर , माऊस, सीपीयू आणि कीबोर्ड असतात.

१०. संगणकाचे मुख्य दोन घटक म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर.

संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi

संगणक हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे वापरणारा त्याला जसा वापरेन तसा तो वापरला जातो. संगणकाची इनपुट डिव्हाईसेस कीबोर्ड माऊस सीपीयू हे आहेत आणि संगणकाचे आउटपुट डिव्हाइसेस मॉनिटर हा आहे. वापरकर्त्याने संगणकाला दिलेल्या निर्देशांच्या संचाला प्रोग्राम असे म्हणतात. आज जगातील चलन केवळ दहा टक्के भौतिक आहे बाकी सर्व संगणकावर अवलंबून आहेत किंवा अस्तित्वात आहेत. आजच्या या शक्तिशाली संगणकाला सुपर कम्प्युटर असे म्हणतात. संगणक कमळ इनपुट घेतो आदेशानुसार प्रक्रिया करतो आणि आऊटपुट देतो

आज संगणक सर्वत्र वापरले जातात कार्यालय रुग्णालय स्टेशन शाळा इत्यादी. संगणकाचे दोन मुख्य घटक असतात ते म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. प्रोग्राम करणे योग्य संगणकाची संकल्पना सर्वप्रथम चाल्स बॅबेज यांनी शोधले. संगणकाची सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि ऍक्सेस मेमरी ही इंटिग्रेटेड सर्किट आहेत.

_________________________

संगणक वर मराठी निबंध | Essay On Computer In Marathi

संगणक हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. पहिला यांत्रिक संगणक ” चार्ल्स बॅबेज ” याने विकसित केला म्हणून त्याला संगणकाचे जनक म्हणून ओळखले जाते. संगणकामध्ये दिलेल्या कच्चा डेटा ला मी माहिती ला ईनपुट म्हणतात. प्रोसेसिंग म्हणजे वापर करताना दिलेल्या निर्देशानुसार डेटाचे ऑपरेशन आणि हाताळणी ही पूर्णपणे संगणकाची अंतर्गत प्रक्रिया आहे. संगणक एका सिस्टीम मध्ये काम करतो ज्यात इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस सेंटर प्रोसेसिंग युनिट सीपीयू आणि स्टोरेज डिव्हाइस असते.

माऊस कीबोर्ड इत्यादी संगणकाचे इनपुट साधने आहेत. आणि मॉनिटर आणि प्रिंटर इत्यादी संगणकाचे आउटपुट साधन आहे. आउटपुट उपकरणांना Peripherals म्हणतात. त्यांच्या वापरावर आधारित तीन प्रकारचे संगणक आहेत म्हणजेच अनलॉग डिजिटल आणि हायब्रीड.

See also  माझे गाव २०० शब्दांत मराठी निबंध-200 Words on my village essay in Marathi

10 lines on computer in Marathi

संगणकीय असे यंत्र आहे ज्यामुळे आपण खूप कामे करू शकता पण यावर टायपिंग करू शकतो चित्र तयार करू शकतो. लहान मुलांना तर संगणक वापरायला खूप आवडतं. माझा छोटा भाऊ देखील कायम संगणक चालू करून त्यावर चित्र काढत असतो. संगणकावर खेळ देखील खेळले जाऊ शकतात संगणकावर नवनवीन विषयांचा अभ्यास देखील आपण करू शकतो आणि संगणकामध्ये इंटरनेट द्वारे आपण संदेशांची देवाण-घेवाण पण करू शकतो.

संगणकामुळे आपल्याला अनेक प्रकारची माहिती लगेच मिळते संगणकाचे दोन मुख्य घटक असतात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. संगणकामध्ये मॉनिटर माउस सीपीयू कीबोर्ड अशे खूप सारे प्रकार असतात.

संगणक वर मराठी निबंध 50 ते 60 शब्दांत

संगणक एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे जे विविध प्रकारच्या कम्प्युटिंग साठी वापरले जाते हे यंत्र प्रगतशील आहे जे की अवघडातील अवघड गणित देखील चुटकीसरची सोडवून दाखवते. संगणकाच्या शोधामुळे मानवी जीवन खूपच सुखद झाले आहे आणि सोयीस्कर झाले आहे कारण सर्वजण आता संगणकाच्या माध्यमातून हिशोब करतात आणि संगणकाच्या माध्यमातून हिशोब केल्यामुळे टाईम देखील कमी लागतो आणि सर्व काम जलद होतात.

चार्ल्स बॅबेज या शास्त्रज्ञाने संगणकाचा शोध लावला आणि चार्ल्सला संगणकाचा जनक देखील म्हणतात परंतु संगणकाच्या निर्मितीचे सर्व श्रेय त्यालाच देता येते असे नाही कारण संगणकाचा आजपर्यंतच्या जडणघडणीमध्ये अनेक शास्त्रज्ञांनी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे.

संगणक आहे एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा मिळून बनलेला एक संच आहे यात एक मॉनिटर असतो जी की संगणकाची स्क्रीन असते मॉनिटरवर संगणकावर होणाऱ्या सर्व क्रिया प्रदर्शित होतात. संगणकामध्ये माऊस कीबोर्ड आणि स्कॅनर यासारखे काही इनपुट साधने आहेत जे मॉनिटर पर्यंत सूचना पाठवतात आणि मॉनिटर त्यावर काम करतो आणि आउटपुट म्हणून स्क्रीनवर ते दर्शवतो. तसेच यात एक सीपीयू असतो ज्याला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते संगणकावर होणाऱ्या सर्व क्रियांचे लॉजिक हे सीपीयू मध्ये प्रोसेस होते सर्व सूचना संगणकाच्या स्क्रीन पर्यंत पोहोचवल्या जातात. संगणकामुळे सर्व जग अगदी जवळ आले आहे त्यामुळे दूर देशात राहणारे व्यक्तीशी संबंध करणे शक्य झाले आहे पूर्वी संवादाची साधने देखील अतिशय कमी उपलब्ध होतील त्यासाठी टपाल चा उपयोग करून दूर राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत संदेश पोहोचावा लागायचा परंतु संगणकामुळे हे सर्व खूप सोपे झाले आहे.

See also  माझे गाव दहा ओळीत मराठी निबंध-10 lines on my village essay in Marathi

संगणकामुळे शिक्षक देखील घरी बसून विद्यार्थ्यांना शिकवू शकतात पण त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे संगणक हे ज्ञानाचे भांडार आहे त्यामुळे हवी ती माहिती संगणकावर सहज मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे देखील सोपे झाले आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना घरी बसून लेक्चर करणे शक्य झाले आहे शिवाय सर्व पुस्तके संगणकावर उपलब्ध असल्यामुळे दप्तराचे ओझे देखील कमी झाले आहे.

संगणकीय संशोधने नक्कीच मानवी जीवनात आनंद आणि समाधान निर्माण करतील मात्र काही यंत्रणा नियंत्रणाच्या बाहेर गेल्यावर मनुष्याच्या अंगलट देखील येऊ शकते त्यामुळे मनुष्याने ही गोष्ट देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मी अशी आशा करते की ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल मी तुम्हाला ही पोस्ट उपयुक्त ठरेल. जर या पोस्टमध्ये काही चुका झाल्या असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्या कमेंट मुळे मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते त्यामुळे नक्की कमेंट करा.

धन्यवाद

 संगणक मराठी निबंध – Sanganak Marathi Nibandh

१. संगणक निबंध मराठी दहा ओळी

२. 10 lines on computer in Marathi

३. संगणक माहिती दहा ओळी

४. 10 lines on Sanganak in Marathi

५. संगणक विषयी माहिती दहा ओळी

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.